सासवड : श्री क्षेत्र जेजुरी (ता. पुरंदर) येथील गड परिसरात पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कला विभागात सन १९९२ ते ९४ साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या जिव्हाळा मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिव्हाळा मित्र परिवाराच्यावतीने मल्हार गडावर उत्कृष्ट प्रकारची देशी झाडे लावून, त्यांना काठीचा आधार बांधून पाण्यासाठी गोल आळीवाफे बनविण्यात आले होते.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन किशोरी ताकवले, निशिगंधा म्हेत्रे, सुनीता गाडेकर, शबाना शेख, राजश्री झेंडे, अश्विनी कादबाने, अनिता भोंगळे, कल्पना कादबाने, कल्पना गिरमे, स्वाती कटके, हनुमंत लवांडे, संतोष लोणकर, संतोष गिरमे, सुनील लोणकर, सतिश शिंदे, विजय कुंजीर, दिलीप कामठे, दादासाहेब कटके, धनंजय गाडेकर, रघुनाथ ढवळे, कैलास भोसले, राजेंद्र कुंजीर, महेश कुंजीर, दत्तात्रय गायकवाड, भाऊसाहेब जगताप, अशोक जगदाळे, विलास सणस, फारुक मणेर, संतोष वारे, रविंद्र कटके, बाळासाहेब कटके यांनी केले.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक किशोरी ताकवले म्हणाल्या कि, सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामुळे जुने वर्गमित्र मैत्रिणी एकत्र येत आहेत. गप्पा गोष्टी, आनंदाच्या, सुखदुः खाच्या देवाण-घेवाणीनंतर पार्टी किंवा स्नेहभोजन हे प्रत्येक ग्रुपचे ठरलेलेच आहे. पण हे करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पुरंदर ज्युनिअर कॉलेजच्या १९९२- ९४ च्या कला शाखेच्या वर्गमित्र-मैत्रिणींनी वृक्षारोपणाचा विचार मांडला.
वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त हे मित्र-मैत्रिणी एकत्र भेटत होते. पण एकत्र भेटण्यामधून काहीतरी सामाजिक बांधिलकी जपावी. ३४ वर्षांनी एकत्र आल्यानंतर आपल्या मैत्रीची एक आठवण म्हणून वृक्ष लागवडीचा उपक्रम करावा ही कल्पना माझ्या मनात आली. ती सर्व मित्र मैत्रिणींना बोलून दाखवली. अनेकांच्या मनात याबद्दल जाणीव होतीच. पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून जेजुरी गडावर मार्तंड देव संस्थान ट्रस्ट यांच्या मार्गदर्शन व मदतीतून वृक्षारोपण करण्यात आले.