-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गाव हे देशात व महाराष्ट्रत प्रसिद्ध असणारे अंजीर लागवडीसाठी अग्रेसर असे गाव आहे. सिंगापूर येथील प्रगतिशील शेतकरी विद्याधर दत्ता लवांडे यांनी 120 गुंठ्यावरील अंजिराच्या बागेतून 40 टन उत्पादन घेत, 20 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
लवांडे यांनी जर्मनीला 150 किलो अंजिराची निर्यात केली आहे. लवांडे यांची वडीलोपार्जित 8 एकर शेती आहे. ते पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असत, तर आता अधिक उत्पादनासाठी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याठिकाणी शेतीवर तीन एकरावर अंजिराची लागवड केली आहे.
कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अंजीर, सीताफळ, संशोधन केंद्र जाधववाडी यांच्या माध्यमातून शेतीत अनेक सुधारणा केल्या आहेत. सर्व ठिकाणची जमीन ही बागायती आहेत. त्यामुळे परिसरात अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे. तीन एकरात पुरंदर जातीची 320 झाडे लावली आहेत. खट्टा बहराची जूनमध्ये छाटणी करून पाच महिन्यात फळ तोडणीस सुरुवात करण्यास आली. प्रति झाडापासून 120 ते 130 किलो उत्पन्न मिळते. एकरी उत्पादन 15 ते 16 टन मिळते, यावेळी प्रति किलोस 90 ते 100 रुपये भाव मिळतो.
मिठाबहार छाटणी कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात असतो. याची सुद्धा साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. भराच्या फळास प्रति किलो 90 रुपये भाव मिळतो. अंजीर फळाची मागणी बाजारपेठेच्या पॅकिंग करून प्रतवारीनुसार मालाची विक्री केली जाते. सासवड, पुणे, मुंबई ,कोल्हापूर, हैदराबाद ,गुजरात, दिल्ली येथे बाहेरील राज्यातील शेतकरी लवांडे यांची अंजीर बागायत पाहण्यासाठी येत आहेत, अशी माहिती विद्याधर लवाडे यांनी बोलताना दिली.