बापू मुळीक / सासवड : काँग्रेस पक्षाने पहिल्याच यादीत आमदार संजय जगताप यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांचा पत्ता कट झाला आहे. तरी ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. म्हणून महाविकास आघाडीतूनच बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या विरोधात माजी आमदार मंत्री विजय शिवतारे, संदीप उर्फ गंगाराम जगदाळे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, संभाजी झेंडे, दत्ता झुरंगे, जालिंदर कामठे हे उमेदवार उभे राहणार असल्याचे पुरंदरची ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. पुरंदर हवेली मतदार संघातून (दि. 26) रोजी सुरेश बाबुराव वीर, राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षाचे दत्तात्रय मारुती झुरंगे आणि डॉ. उदयकुमार वसंतराव जगताप यांनी आपले अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. तर (दि. 28 ऑक्टोबर) आणि (दि. 29) रोजी प्रामुख्याने दोनच दिवस बाकी असताना पुरंदरमध्ये शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करताना जालिंदर कामठे, संभाजी झेंडे, विजय शिवतारे, संजय जगताप, गंगाराम जगदाळे हे मातंबर येत्या दोन दिवसात सासवडमध्ये शक्ती प्रदर्शन करूनच आपले अर्ज दाखल करणार आहेत.
संजय जगताप यांचे पहिल्याच यादीत नाव आल्याने त्यांनी गावोगावी जाऊन प्रचार यंत्रांना राबवण्यात सुरुवात केली आहे. त्यात गंगाराम जगदाळे यांचा सुद्धा गाव भेटी दौरा हा पुरंदर हवेलीमध्ये प्रचार यंत्रणा चांगलीच चाललेली पहावयास मिळत आहे. विजय शिवतारे यांचे सुद्धा वाडी वस्ती, पुरंदर हवेलीच्या कानाकोपऱ्यात आपली प्रचार यंत्रणा ही जोमाने चालू आहे. तर बाकी संभाजी झेंडे, दत्ता झुरंगे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गा डे, जालिंदर कामठे यांची सुद्धा पुरंदर हवेलीच्या कानाकोपऱ्यात प्रचार यंत्रणात चांगल्या जोमाने चालू असल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये संजय जगताप यांनी पुरंदर हवेलीमध्ये चांगलीच आघाडी घेतलेली दिसून आली आहे. तर यामध्ये बंडखोरी करणारे व विरोधातून लढणा-यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु यातील खरे चित्र तर चार नोव्हेंबर रोजीच कळेल, की संजय जगताप यांच्या विरोधात चौरंगी निवडणूक विधानसभेची पुरंदर हवेलीची होईल, अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत आहे. खरी स्थिती दि. 4 नोव्हेंबर लाच कळेल की संजय जगताप यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार आहे हे नक्की समजेल.