-बापू मुळीक
सासवड : येथील पुरंदर -हवेली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पोलीस पाटील हा प्रशासन आणि गाव यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, पोलीस पाटलांच्या शब्दाला गाव पातळीवर चांगला मान असतो. त्यामुळे पोलीस पाटील यांनी आपले वर्तन आणि भाषा ही नेहमी चांगली सुस्थितीत असली पाहिजे. आपले कर्तव्य निष्पक्ष पद्धतीने निवडणूक काळात बजवले पाहिजे. निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे आदर्श म्हणून बजवले पाहिजे, असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
सासवड पोलीस ठाण्याअंतर्गत 50 गावातील पोलीस पाटलांची बैठक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. त्यावेळी अधिकारी बोलत होते.
यावेळी विनायक गायकवाड, तानाजी काकडे, मनोहर पायगुडे, कैलास जाधव, धीरज यादव, संदीप बाठे, सचिन दळवी, अमोल लोळे, अक्षय शिंदे, कल्पेश वाडकर, गणेश काकडे, संतोष धुमाळ, गणेश बडधे, कविता झुरंगे, सारिका झेंडे, सारिका खवले, प्रिया बोराडे आदी यावेळी उपस्थित होते.
202 पुरंदर -हवेली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोख पद्धतीने बजावले पाहिजे, प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकारची गावांमध्ये कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आव्हान सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.