पुणे: पुण्यातील नागरिक सध्या मेट्रोचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे म्हंटले तर पुणेरी पाट्या हमखास डोळ्यासमोर येतात. दरम्यान, आता पुण्याच्या मेट्रोमध्येही पुणेरी पाट्यांचे दर्शन होणार आहे. प्रवाशांना महत्त्वाचे संदेश देण्यासाठी विनोदी अंदाजात लिहिलेल्या सूचना संपूर्ण मेट्रोमध्ये लावण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मेट्रोचा अनुभव अधिक आनंददायी, सुखकर बनणार आहे. हे फलक पुण्याच्या अद्वितीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवतात आणि शहराच्या आकर्षणात भर घालण्याचे महत्वाचे कार्य करतात.
येथे पाहा, मेट्रोतील पुणेरी पाट्या
कसा वाटला पुणेरी ‘मेट्रो पाटी’चा बाणा?
Stay tuned for Part 2…#Punemetro #Puneripatya #Metroetiquettes #Punekar#PuneVibes #UrbanTransport #MetroLife #CleanTravel #MahaMetro #SafeCommute #PuneCity #पुणेकर#पुणेरीठसा #शिस्तबद्धप्रवास #स्मार्टपुणे#मेट्रोप्रवास #पुणेमाझंशहर… pic.twitter.com/XLHjYyzMEb— Pune Metro Rail (@metrorailpune) April 20, 2025
मेट्रोमध्ये पुणेरी पाट्या पाहून प्रवाशांना आनंद झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलत असल्याचे दिसून येत आहे. मेट्रोचा परिसर आणि मेट्रो अधिक आकर्षक बनवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणाऱ्या प्रवाशांमध्ये हे फलक चर्चेचा विषय बनले आहेत. पुणेरी पाट्या हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आढळणाऱ्या नेहमीच्या सौम्य आणि औपचारिक संदेशापेक्षा काहीतरी वेगळे होते. स्थानिक भाषा आणि विनोद यांचा समावेश करून, मेट्रोने प्रवाशांसाठी अधिक स्वागतार्ह आणि आनंददायी पुणेरी पाट्या लावून प्रवासाचा आनंद द्विगुणीत केला आहे.