लोणी काळभोर: पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या ग्रामीण भागात औद्योगीकरण आणि शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना प्लॉटस, फ्लॅट्स व इतर रिअल इस्टेट प्रकल्पांची खरेदी-विक्री करण्यासाठी खूप अडचणी व समस्या येत असतात. त्या अडचणी सोडविण्यासाठी आपल्यासाठी आता ‘पुणे फाईंड्स’ हे हक्काचे ठिकाण झाले आहे, जिथे तुम्हाला वरील सर्व अडचणींवर मार्ग मिळेल. ‘पुणे फाईंड्स’ नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा देऊन त्यांच्या विश्वासास पात्र ठरेल, असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ‘पुणे प्राईम न्यूज’च्या कार्यालयात ‘पुणे फाईंड्स’ या वेबसाईटच्या लोगोचे अनावरण बुधवारी (ता.17) करण्यात आले. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, बांधकाम व्यावसायिक देविदास कदम, अभियंता आशिष देशमुख, प्रावी कन्सल्टंटचे मल्हार पांडे, प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, ज्येष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर, विजय काळभोर, चंद्रकांत दुंडे,अमोल अडागळे, रियाज शेख, अॅड. आकांक्षा दांडगे, पूजा बडेकर, विकी गायकवाड, संदीप जरे, उद्योजक धीरज भुजबळ, शामराव पवार, गौरव कवडे, विशाल कदम, आकाश दांडगे, हनुमंत चिकणे, श्रीनिवास पाटील व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ‘पुणे फाईंड्सचे संस्थापक व ‘पुणे प्राईम न्यूज’चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे म्हणाले की, ‘पुणे फाईंड्स’च्या माध्यमातून आपल्या भागातील फ्लॅट्स व इतर रिअल इस्टेट प्रकल्प आपल्या मोबाईलवर एक क्लिक केले की, दिसणार आहे. मालमत्ता धारकांना व ग्राहकांना एकमेकांशी थेट संपर्क करता येणार आहे. ‘पुणे फाईंड्स’ ही वेबसाईट येत्या 1 ऑगस्टपासून नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या वेबसाइट वर Buy, Rent आणि sell असे तीन पर्याय उपलब्ध असणार आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना प्लॉटस, फ्लॅट्स व इतर रिअल इस्टेट प्रकल्पांची माहिती घेताना होणारा त्रास वाचणार आहे. ‘पुणे फाईंड्स’ची सेवा ही पूर्णपणे मोफत असणार आहे.