पुणे: आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ चार हद्दीतील १२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळचे चारचे पोलीस उप आयुक्त यांनी ही कारवाई केली.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ चारमधील पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावर खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडयाची तयारी करणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, दुखापत करुन मारहाण करणे, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर अग्निशस्त्र व प्राणघातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगणे, दहशत करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी व घरफोडी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकार्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा म्हणुन संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. परिमंडळ चारचे उपायुक्त यांनी या प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे ११ गुन्हेगारावर व कलम ५७ प्रमाणे ०१ गुन्हेगार असे एकुण १२ गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये येरवडा हरजितसिंग ऊर्फ सोनु सरबजितसिंग सिध्दु (वय ४५ वर्षे, रा.स.नं.१९१ भंगार गल्ली नागपुरचाळ, येरवडा), विकास ऊर्फ महाराज भगत तौर (वय ३६ वर्षे, रा.स.नं.१२ क्षिरसागर हॉलमागे लक्ष्मीनगर येरवडा), अजय गणेश राठोड (वय २४ रा.स.नं. १४ लाकडी वखारी जवळ जयजवाननगर येरवडा), रुपेश दिलीप आडागळे (क्य २४ वर्षे रा.स.नं.१०३ माऊली चौकाजवळ जयप्रकाशनगर येरवडा), शंकर मानु चव्हाण (वय ५४ वर्षे, रा. स.नं.१४ पांडुलमाणवस्ती येरवडा), बळीराम सुदाम पतंगे (वय २३ वर्षे, रा. दिनकर पठारे वस्ती, दुर्गा माता मंदिरा शेजारी, खराडी), अरबाज असलम शेख (वय २२ वर्षे, रा.एस.आर.ए. बिल्डींग विमाननगर), योगेश प्रकाश म्हस्के (रा. गल्ली नं. ४ यमुनानगर विमाननगर), गणेश यमनप्पा कुर्डेकरी (वय २४ वर्षे, रा. गल्ली नं.१ चाळ क्र.६ नेरेगल मठाजवळ, पांडवनगर), सोमनाथ ऊर्फ सोम्या धोत्रे (वय ४५ वर्षे, रा.आकाश गंगा सोसायटी समोर, सार्वजनिक संडास शेजारी, वडारवाडी), गौरव ऊर्फ महादु सातव (वय ३३ वर्षे, रा. डोमखेल वस्ती आव्हाळवाडी ता. हवेली) महेंद्र संभाजी कुटे (वय ३८ वर्षे, रा. आव्हाळवाडी ता. हवेली) यांचा समावेश आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.