पुणे – पुणे जिल्हा परिषदेत आता वॉररूम उभारण्यात आले आहेत. ‘विकास योजना निरीक्षण कक्ष’ अये या वॉररूम देण्यात आले आहे. यासाठी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वॉररूम मधून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर लक्ष देण्यात येणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण देखील ठेवण्यात येणार आहे. कोरोना काळात जिल्हा परिषदेत एका कक्षातून सर्व यंत्रणा काम करीत होत्या. हाच अनुभव लक्षात घेत असा एक कायमस्वरूपी कक्ष असावा, अशी संकल्पना पुढे आली. त्यानुसार जिल्हा परिषदेने एक निरीक्षण युनिट स्थापन केले आहे.
ही आहेत सुविधा..
१) या कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व संवादासाठीची अत्याधुनिक यंत्रणा बसवली आहे.
२) जिल्हा नियोजन समितीच्या पर्यवेक्षण आणि मूल्यमापन आर्थिक प्रमुखाच्या अंतर्गत निधी.
अशी कामे चालतात…
१) जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद उपकर, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानांतर्गत मंजूर सर्व सार्वजनिक कामांच्या प्रगतीवर येथून नजर ठेवणे शक्य.
२) लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाबद्दलची दैनंदिन माहिती संकलित आणि त्याचे विश्लेषण.
३) विविध विभागांच्या कल्याणकारी कार्यक्रम आणि योजनांच्या अंमलबजावणीवरही नजर ठेवली जाणार आहे.
४) जिल्हा परिषदेच्या दृश्यमान सॉफ्टवेअर प्रणालीच्या मदतीने कंत्राटदारांना कामाच्या प्रगतीचे दैनंदिन अपडेट भरता येते, यावरही या वॉररूममधून वॉच ठेवता येणार आहे.
५) डेटा व्यवस्थापन आणि वास्तविक वेळेत समन्वय साधण्यास या कक्षामुळे मदत होणार आहे. यातून विकास योजनांचे निरीक्षण केले जाणार असल्याने प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी करण्यास उपयोगी ठरणार आहे.
६) सामान्य नागरिकांना एखाद्या समस्येबाबत, कामाबाबत तक्रार करायची असल्यास टोल फ्री कॉल क्रमांकावर ती नोंदवता येणार आहे. त्यांची कामेही याच ठिकाणी होणार आहेत.