लोणीकंद: ‘तुला आठ दिवसात डेमो देतो’, असे म्हणत एकनाथ शिंदे गटाचे पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख गणेश सातव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धमकीनंतर गणेश सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून गणेश सातव यांच्या गाडीवर चिट्ठी चिटकवत ही धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांची गाडी पार्किंगमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने एक पत्र गाडीला चिटकवले. त्यावर गण्या सातव लय माज आला आहे का? तुझ्या **वर वार करणार आहे, तुला आठ दिवसात डेमो देतो, अशा अशयाची चिठ्ठी चिकटवून धमकी देण्यात आली आहे.