पुणे : Pune Wrestling -लोहगावातील संत तुकाराम महाराजांच्या उत्सवानिमित्त आठवडे बाजार परिसरात कुस्ती आखाड्याचे (Pune Wrestling) आयोजन केले होते. या आखाड्याचा मानकरी ठरला असून उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली कोकाटे (Upa Maharashtra Kesari Mauli Kokate)याने महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील याला चितपट करीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज केसरी (champion of Tukaram Maharaj Kesari) चांदीची गदा व दोन लाख रुपये रोख इनाम पटकाविला. (Pune Wrestling)
रायबा तालीमतर्फे 1 ते 25 निकाली कुस्त्या
यावेळी गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. पंच गावकरी सार्वजनिक रायबा तालीमतर्फे 1 ते 25 निकाली कुस्त्या घेण्यात आल्या. यात महाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरुद्ध पै. शैलेश शेळके, मुळशी केसरी मुन्ना झुंजारके विरुद्ध नॅशनल चॅम्पियन आशिष हुड्डा, महान भारत केसरी शुभम सिंधनाळे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन वैभव माने यांच्यात कुस्त्या झाल्या. या आखाड्यात हिंद केसरी पै. अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांचा सन्मान करण्यात आला.
माजी आमदार बापूसाहेब पठारे, अशोक खांदवे, राजेंद्र खांदवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, रायबा तालमीचे अध्यक्ष सोमनाथ मोझे, हरिदास मोझे, शरद खांदवे, नीलेश पवार, विश्वास खांदवे, सुरेश शेजवळ, दीपक मोझे, मिलिंद खांदवे, माऊली पवार, सुभाष काळभोर आदी उपस्थित होते. निवेदन हानंगेश्वर धायगुडे यांनी केले.
1 हजार ते 2 लाखांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती. शेवटची कुस्ती पै. अक्षय शेळके वि. पै. अक्षय मदने यांच्यात बरोबरीत झाली. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी उपसभापती संतोष लाला खांदवे, प्रीतम खांदवे, सुनील खांदवे, मोहनराव शिंदे, प्रकाश खांदवे, रामभाऊ खांदवे, संदीप लांडगे, विकास भुकन, दादा निंबाळकर, अविनाश मोझे व नागरिक उपस्थित होते. आजोळ ट्रस्टच्या वतीनेही कुस्ती स्पर्धा दरम्यान, संत तुकाराम महाराज आजोळ ट्रस्टच्या वतीने कुस्त्या याच आखाड्यात घेण्यात आल्या.