पुणे : ललित कला केंद्रात सादर केलेल्या नाटकात वादग्रस्त संवाद प्रकरणाची सावित्रीबाई फुले विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संबंधी विद्यापीठाकडून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत असून, विद्यापीठाने जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे.
विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत, विद्यापीठ आणि परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
विचार, मत, भावना व्यक्त करताना विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज करताना कोणताही अडथळा येणार नाही, असे जाहीर आवाहन विद्यापीठाने केले आहे.