पुणे : लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी प्रत्येक मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून, त्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग आणि अहमदनगर उपकेंद्र १३ मे रोजी बंद राहणार आहेत. तर नाशिक उपकेंद्र २० रोजी बंद राहणार आहे. पुणे व नगर मतदारसंघात १३ रोजी मतदान आहे.
नाशिक मतदारसंघात २० रोजी मतदान आहे. त्यामुळे १३ रोजी पुणे विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग आणि अहमदनगर उपकेंद्र बंद राहतील. तर नाशिक मतदारसंघ २० रोजी बंद राहील. शासनाच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील, त्यांनादेखील संबंधित मतदारसंघांमधील मतदानाच्या दिवसाची सार्वजनिक सुट्टी लागू राहील. विद्यापीठात कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षतेकर सेवक ज्या मतदारसंघाचे मतदार आहेत, त्या मतदारसंघाची दि. १३ व्यतिरिक्त इतर दिवशी निवडणूक असेल, त्या दिवशी शिक्षक शिक्षकेतरांना मतदान करण्याकरिता सुट्टी राहील. मतदानासाठी सुट्टी घेण्यापूर्वी संबंधितांनी विभागप्रमुख यांचेमार्फत प्रशासन शिक्षकेतर कक्षास लेखी कळविणे गरजेचे आहे, असे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी सांगितले.