पुणे : Pune triple murder Case – पुणे शहरातील कोंढवा परिसरात दिराने वाहिणीसह दोन पुतण्यांना जिवंत जाळून हत्त्या केली होती. हा धक्कादायक प्रकार अनैतिक संबंधातून घडला होता. या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्यास कोंढवा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
ही हत्या कोंढवा परिसरातील पिसोळी येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी दि.५ एप्रिल रोजी मध्यरात्री करण्यात आली आहे. दिराने वहिनीसह तिच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून जाळून हत्या केली त्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
आम्रपाली रमेश वाघमारे, (वय २४ वर्षे), आदित्य (वय ०४ वर्षे)व मुलगी कु. रोशनी,(वय ०६ वर्षे) असे मृतांची नावे असून घटनास्थळी महिलेचे ओळखपत्र व पुस्तकांवर असलेल्या नावावरून ओळख पटली.
यावेळी आरोपी वैभव रुपसेन वाघमारे याचा मोबाईल नंबर मिळून आला. आरोपीबाबत अधिक चौकशी केली असता आम्रपाली हिच्या बरोबर रहात असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीसांनी मोबाईल नंबरवून आरोपीचा शोध घेतला. तेव्हा तो पुण्यातील हांडेवाडी चौकात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. दरम्यान तेथून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले.
काय आहे प्रकरण
३० वर्षीय आरोपीचे तिच्या वहिनीशी अनैतिक संबंध होते. मात्र आरोपीला तिच्या वहिनीचे आणखी कोणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांच्यामध्ये वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात त्याने वहिनीला आणि तिच्या सहा अन् चार वर्षांच्या मुलीस संपवले. त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या तिघांचे मृतदेह घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून जाळले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा: