Pune | पुणे : पुणे आणि राजगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पनवेल येथील एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
अजय काळे (वय – ६२) असं या पर्यटकाचं नाव आहे. पनवेल येथील एका ग्रुपमधील हा पर्यटक असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर लिंगाणा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे. रविवारी पनवेल येथील एक ट्रेकर्सचा ग्रुप या मार्गी लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. ६ ते ७ जणांचा हा ग्रुप होता. त्यात अजय काळे हे सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी ट्रेकर्स होते. ट्रेकिंग करताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…
दरम्यान, गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून ते ट्रेकिंग करत होते. त्यांनी आतापर्यंत अनेक गड-किल्ले सर केलेले आहेत. आताचा जो ट्रेकिंगचा ग्रुप आला होता. त्यात ते मार्गदर्शक म्हणून आले होते. ते लिंगाण्यावर जाणार नव्हते. फक्त ते मार्गदर्शन करणार होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime News | सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांकडूनच खंडणी उकळली
Pune | रसदार फळे महागली, फळांच्या भावात एवढ्या; टक्क्यांनी वाढ
National Honor Award | शेखर कासुर्डे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने गौरविले