पुणे: अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या एका गटाने अविन्या नावाचे ऑफ-रोड वाहन डिझाइन आणि तयार केले आहे, ज्याने हैदराबादजवळ झालेल्या ई-बाहा स्पर्धेत क्रमांक मिळवला असून शिष्यवृत्तीही मिळवली आहे. ओंकार नवकुडकर आणि नितीशा कपाडिया यांच्या गटाला एसएईइंडिया सेक्शन पुरस्कार आणि शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे. अविन्या या ऑफ-रोड वाहनाने यांत्रिक आणि विद्युत तांत्रिक चाचण्या, पावसाळी चाचण्या आणि ट्रॅक चाचण्यांसह विविध आव्हाने यशस्वीरित्या पूर्ण केली. या स्पर्धेत त्यांचा हा पहिलाच सहभाग असल्याने संघाने केलेली कामगिरी उल्लेखनीय मानली जात आहे. एसएईइंडियाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील नवसंशोधन, सर्जनशीलता यांना व्यासपीठ देण्यासाठी ई – बाहा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात या विद्यार्थ्यांनी हि उत्तम कागिरी केली आहे.
संघ प्रयत्न आणि मार्गदर्शन
संघाला डॉ.इप्सिता स्वेन आणि डॉ.विवेक गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले असून ओंकार नवकुडकर, योगेश के.सी., अमीर सय्यद, खुशी चावडा, ऋषिकेश पट्टेवार, वरद पैठण शर्मा, राम पाटील, ऋषिकेश पट्टेवार, साद शेख, आशुतोष माने, तल्हा शेख, आलोक सिंग, नितीशा कपाडिया, आतीफ पटेल, कुशाग्र तोमर, भरत जांगीड आणि भानाला मनस्विनी या विद्यार्थ्यांच्या टीमने या वाहनाची रचना, बांधणी आणि चाचणी केली आहे.
SAEIndia चा उपक्रम
विद्यार्थ्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी SAEIndia e-BAHA स्पर्धा आयोजित करते. ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि उपाय विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.