नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील मात्र, सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी नील आचार्य हा बेपत्ता झाल्याची माहिती रविवारी सोशल मीडियावर समोर आली होती. मात्र, बेपत्ता झालेल्या या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. नील आचार्य हा विद्यार्थी पर्ड्यू विद्यापीठात संगणक विज्ञान आणि डेटा विज्ञानाचे शिक्षण घेत होता. विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाला लिहिलेल्या सोमवारी ईमेलमध्ये, अंतरिम सीएस प्रमुख ख्रिस क्लिफ्टन यांनी आचार्य याच्या मृत्यूबद्दल विद्यार्थी आणि प्राध्यापकांना माहिती दिली आहे.
क्लिफ्टन यांनी लिहिले की, “मला तुम्हाला कळवताना अत्यंत दुःख होत आहे की, आपला एक विद्यार्थी नील आचार्य याचे निधन झाले आहे. माझ्या संवेदना त्याच्या मित्र, कुटुंब आणि सर्वांसोबत आहेत.” क्लिफ्टन यांनी नील आचार्य हा विद्यार्थी “व्यक्तिगत आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रतिभावान” असल्याचे म्हटले. आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आमचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, Tippecanoe काउंटी कोरोनर कार्यालयानुसार, अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी साडे आकाराच्या सुमारास शोध घेत असताना त्यांना ५०० ऍलिसन रोड वेस्ट लाफायेटच्या पर्ड्यूच्या कॅम्पसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह आढळून आला. नील आचार्य असं मृत विद्यार्थ्याचं नाव असल्याचं अधिकाऱ्यांनी कन्फर्म केलं. पर्ड्यू एक्सपोनंट जी विद्यापीठाची स्वतंत्र मल्टीमीडिया एजन्सी आहे याच्या माहितीनुसार, सोमवारी विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाला लिहिलेल्या ईमेलमध्ये प्रमुख पदाधिकारी ख्रिस क्लिफ्टन यांनी नील आचार्यच्या मृत्यूची माहिती विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिली.
US: Missing Indian student of Purdue University, confirmed dead
Read @ANI Story | https://t.co/uzYcWM9DGY#US #IndianStudent #PurdueUniversity pic.twitter.com/DHaHu1cfcA
— ANI Digital (@ani_digital) January 30, 2024