पुणे : प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोलापूर- दौंड मार्गावरही रेल्वे गाड्या ताशी 130 किमी वेगाने धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 15 दिवसांत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी दिली.
गेल्या एक वर्षापासून पुणे विभागातून पुणे-दौंड दरम्यान रेल्वे ताशी 130 किमी वेगाने धावत आहेत. त्यामुळे पुणे-दौंड प्रवास वेगाने सुरु आहे. मात्र सोलापूर विभागातील दौंड सोलापूर दरम्यान रेल्वे रुळ व इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या सुरु असलेला दौंड सोलापूर दरम्यानचा प्रवास हा 110 किमी वेगाने रेल्वे धावतात. त्यामुळे वेळ जास्त लागतो. येत्या काही दिवसात हाच वेग अधिक वाढणार आहे, त्यामुळे याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना पुण्यातून सोलापूरला जाण्यास तीन-साडेतीन तासांत पोहचणे शक्य होणार आहे.