विशाल कदम
Pune Solapur Highway News : लोणी काळभोर (पुणे)- पुणे शहरातून सातारा, नाशिक, मुंबई, नगरला जाणाऱ्या सर्वच मोठ्या रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटी, हजार कोटी, दहा हजार कोटी असे सर्वसामान्य जनतेला लिहता न येणारे आकडे दरवर्षी मंजुर होत असतांना, पुणे शहरातुन सोलापुरला जाणाऱ्या” पुणे-सोलापूर” महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केंद्र अथवा राज्य शासनाकडून मागील पाच वर्षाच्या काळात एक छदामही मंजुर झाली नसल्याची बाब पुढे आले. नगर, सातारा, नाशिक रस्त्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजुर केल्याच्या बातम्या येत असतांना, पुणे-सोलापूर महामार्गाला मात्र सवतीच्या लेकरासारखी वागणुक मिळत असल्याची चर्चा जनतेत रंगू लागली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वाघोली ते शिरुर या दरम्यान हजारो कोटी रुपये खर्चुन उन्नत मार्ग तयार करण्यात येणार असल्याची चर्चा चालू असतांना, तेवढीच वाहतूक कोंडी असणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गासाठी मात्र एकही माई का लाल (मग तो सत्ताधारी पक्षातला असो वा विरोधी पक्षामधील) बोलत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. (Pune Solapur Highway News) खासदार, आमदार यांच्यासह अनेक नेते केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीनजी गडकर यांना भेटल्याचे फोटो दाखवूनच, जनतेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात होत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व पुणे महापालिका प्रशासनाने उशीरा का होईना अतिक्रमणांवर कारवाईस सुरूवात केली आहे. तर नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस प्रसासन, महानगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. (Pune Solapur Highway News)
दरम्यान, या मार्गावरील बेकायदा पार्किंग, चारचाकी वाहने व पानटपऱ्यांचे सेवा रस्त्यांवरील वाढलेले पक्क्या बांधकाम असलेलीअतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु केलेली आहे. तर दुसरीकडे या मार्गावरील वाहतुक कोंडी कायमस्वरुपी सोडविण्यासाठी हजारो कोटी खर्चुन दुमजली उड्डानपूल उभारण्याच्या हालचाली चालू आहेत. तर नाशिक मार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर झाला असून, कांही कामेही सुरु झाली आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गासाठीच वेगळा न्याय का?
पुणे शहरातुन सातारा, नाशिक, मुबंई, नगरला जाणाऱ्या सर्वच मोठ्या रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटी, हजार कोटी, दहा हजार कोटी असे सर्वसामान्य जनतेला लिहता न येणारे आकडे मंजुर होत आहेत ही बाब जिल्हाच्या दृष्ट्रीने अतिशय चांगली आहे. (Pune Solapur Highway News) वरील सर्व रस्त्यासाठी निधी मिळत असल्याने, पुणे शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकासाठी रस्ते चांगले होतात ही बाब गौरवास्पद आहे.
मात्र नगर रस्त्यासारखीच वाहतूक कोंडी पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, आकाशवाणी, भैरोबानाला, पुलगेट चौक, किर्लेस्कर पुल अशा दहाहुन अधिक ठिकाणी रोज असतांना, या वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी कोणीही चकार शब्द काढत नसल्याचे चित्र आहे. नगर रस्त्यावरुन प्रवास करणारे देशाचे, राज्याचे अथवा पुणे शहराचे नागरीक असतील तर, पुणे-सोलापूर महामार्गावरुन प्रवास करणारे कोण असा प्रश्न पडावा अशी परिस्तीथी आहे.
संसदपटु खासदार-कार्यसम्राट आमदार नावालाच..
खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार या दोघेही मागील चार वर्षाच्या काळात नगर रस्ता, नाशिक या रस्त्याची दुरुस्ती व या रस्त्यांच्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याबदद्ल बोलत असल्याचे दिसून आले आहे. (Pune Solapur Highway News) मात्र दोघांनीही मागील चार वर्षाच्या काळात पुणे-सोलापुर महामार्गावरील हडपसर ते कासुर्डी या दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केल्याचेही कोणालाही दिसुन आलेले नाही.
कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यानचा टोल बंद झाल्यापासुन, या रस्त्याची अवस्था अतीशय खराब झालेली आहे. वाहतुक कोंडी ही बाब सततची बनलेली आहे. अपघात वाढले आहेत. रस्त्यावर अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. अपघातातील मृत्युचे प्रमाण वाढले आहे. मात्र संसदपटु खासदार-कार्यसम्राट आमदारांच्याबरोबरच आत्ताचे सत्ताधारीही मुग गिळुन बसल्याचे चित्र दिसुन येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur Crime : संतापजनक ! १८ दिवसाच्या बाळाला तीन महिलांनी ३ लाखाला विकले