विशाल कदम
लोणी काळभोर : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी पुणे ग्रामीण डाक विभागातर्फे सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम सभेदरम्यान डाक मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी ग्रामस्थांना डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध आकर्षक गुंतवणुकीच्या व विमा योजनांबाबत स्थानिक पोस्टमास्तर व डाक कर्मचाऱ्यांकडून माहिती दिली जाणार आहे. डाकघरात केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित असल्यामुळे व गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर इतर सरकारी व खासगी बँकापेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहक व नागरिकांचा डाकघरात गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे.
यामुळे पुणे ग्रामीण डाक विभागातील सर्व सरपंचांनी प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभेदरम्यान डाक मेळावा आयोजित करण्यासाठी स्थानिक पोस्टमास्तरांना सहकार्य करून, डाक विभागाच्या विविध योजनेमध्ये गुंतवणूक कराव, व आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे डाकघर अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी केले आहे.