–संतोष पवार
पळसदेव : पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडे्ट समोर आली आहे. पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यापूर्वी आवश्यक कागदपत्र पडताळणी यादी पुणे ग्रामीणचे अधिकृत संकेतस्थळ https://puneruralpolice.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणसाठी रिक्त असेलेल्या 448 पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहित गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे, अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ही मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे व भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी लक्षात घेता कागदपत्र पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी यादी https://puneruralpolice.gov.in संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यानुसार उमेदवारांना आवेदन अर्जाची प्रत, 6 पासपोर्ट साईज फोटो, राष्ट्रीयकृत बँक खातेच्या पासबुक प्रती व कॅन्सल चेक तीन प्रती, आधार कार्ड व पॅनकार्डच्या प्रत्येकी तीन छायांकित प्रती, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड) यापैकी एक, आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरला असल्यास जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिलेअर, आर्थिककृष्टया दुर्बल घटक प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केला असल्यास ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
अधिवास प्रमाणपत्र (Domicile) आवेदन अर्जात नमूद केलेले समांतर आरक्षणाबाबतचे (गृहरक्षक/प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्त/अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य / अनाध/ खेळाडू / माजी सैनिक/ युद्धात अपंग झालेल्या किंवा मृत झालेल्या सैन्यातील व्यक्तीचे कुटुंबीय) प्रमाणपत्र/ कागदपत्र तसेच महिला समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या महिला उमेदवारांनी मागासवर्गीय असल्यास (खुला, अनुसूचित जाती व जमाती वगळून) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, संगणक अर्हता प्रमाणपत्र, NCC “C” प्रमाणपत्र, हलके वाहन चालविण्याचा (LMV) किंवा (LMV-TR) वैध परवाना यांसारख्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.