Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चॉईस नंबरसाठी पुणे आरटीओला मिळाला ४७ कोटी १४ लाखांचा महसूल; गतवर्षीच्या तुलनेत १४ कोटींनी वाढ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 18:01

पुणे : फॅन्सी (चॉईस) नंबरमधून पुणे आरटीओला मागील वर्षभरात तब्बल ४७ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २०२३ या वर्षी महसुलात १४ कोंटीची वाढ झाल्याचे आरटीओतील आकडेवारीतून समोर आले आहे.

दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करण्यापूर्वी आपल्या वाहनाचा क्रमांक हटके असावा, अशी अनेक वाहनमालकांची इच्छा असते. यासाठी आरटीओमध्ये गर्दी होते. हौशी वाहनमालक तर वाट्टेल तेवढे पैसे मोजतात, आणि फॅन्सी नंबर मिळवतात. अनेकजण लकी नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख नंबरप्लेटच्या माध्यमातून गाडीला लावण्यासाठी आग्रही असतात. यासाठी परिवहन विभाग पैशांची आकारणी करतो. पसंतीच्या क्रमांकासाठी विशिष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर हा नंबर संबंधित वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो.

एकाच नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेशधारकाला तो नंबर दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव होतो. आरटीओच्या या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये आरटीओ कार्यालयाला एकूण ३३ कोटी ५० लाख ५७ हजार ८५१ रुपये महसूल मिळाला. तर, २०२३ मध्ये यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये परिवहन विभागाला ४७ कोटी १४ लाख ९६ हजार ८०७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामुळे २०२२ च्या तुलनेत १४ कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 

एका चारचाकी वाहनधारकाने त्यांच्या कारला १ नंबर असावा, यासाठी तब्बल १२ लाख रुपये मोजल्याची नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. विशेषतः एक ते दहा या क्रमांकासाठी सर्वाधिक पैसे मोजले जातात.

याविषयी माहिती देताना पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, चॉईस नंबरच्या माध्यमातून पुणे आरटीओ कार्यालयाला २०२३ या वर्षभरात एकूण ४७ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. चॉईस नंबरसाठी नागरिकांची चांगली पसंती मिळत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

येरवडा परिसरातील महिला सायबर क्राईमची शिकार, गॅस एजन्सी असल्याचे भासवत साडेसहा लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.