पुणे : पुण्यातील काही परिसरात गुरुवारी म्हणजेच २ मार्चला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रामटेकडी ते खराडी भागात जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी कमी दाबाने पुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार : रामटेकडी, ससाणे नगर, हडपसर गावठाण, फुरसुंगी, सातववाडी, मगरपट्टा, वानवडी, केशवनगर, मुंढवा गाव, गाडीतळ.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेने बाधित भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि शटडाऊन दरम्यान महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.