पुणे : महाराष्ट्रात (Maharashtra) उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या ऊनामुळे थंडगार पेयला जास्त पसंती दिली जात आहे. तर काही शौकींनांकडून थंडगार बीअरला पसंती दिली जात आहे. देशी आणि विदेशी मद्यचा आस्वाद अनेकजण घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील शौकींनांनी एप्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षभरात 13 कोटी 88 लाख 37 हजार 321 लीटर दारुचा वापर केलाय.
उन्हाळ्यात बीअरला जास्त मागणी असते. विदेशी मद्य आणि बिअर घेणा-यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे थंडगार बीअरची विक्री जास्त होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मागील वर्षात बीअरची विक्री ९.२ टक्क्यांनी वाढली. तर देशी ७.४ टक्क्यांनी वाढली आहे तर विदेशी मद्य ९.८ टक्के जास्त विकले गेले.
देशी दारु स्वस्त मिळते म्हणून दारु घेणा-यांची संख्या मोठी आहे. तसेच विदेशी मद्य आणि बिअर घेणा-यांच्या संख्येतही वाढहोत आहे. पार्टी तसेच एन्जॉयमेंट म्हणून बि्अरला जास्त पसंती दिली जाते.
आर्थिक वर्षनिहाय (एप्रिल ते मार्च) मद्यविक्री
1) देशी दारु – वर्ष- विक्री (कोटी लिटरमध्ये)
– 2021-22 = 2,70,70,412
– 20022-23=3,10,26,283
– 2023-24=3,33,22,901
2) विदेशी दारु – वर्ष- विक्री (कोटी लिटरमध्ये)
– 2021-22 = 3,48,74,588
– 20022-23=4,30,17,702
– 2023-24=4,72,50,062
3) बीअर – वर्ष- विक्री (कोटी लिटरमध्ये)
2021-22 = 3,51,70,392
– 20022-23=5,82,64,358
– 2023-24= 5,31,10,136