पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडीची लाट पसरली आहे. राज्यातील अनेक भाग गारठल्याचे चित्र आहे. पुण्यात सोमवारी सहा वर्षातील सर्वांत निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातील काही भागात 6.1 तर काही भागात 6.2 इतके निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
पुण्यामध्ये सोमवारी सहा ते सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 18 डिसेंबरपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे 2018 पासून पहिल्यांदाच तापमानाचा पारा सहा पर्यत घसरला आहे. 2018 मध्ये 5.9 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. त्याआधी 2013 आणि 2015 मध्ये सहा अंशाजवळ तापमानाचा पारा पोहचला होता.
पुणे शहरातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दिवाळीनंतर थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होत आहे.
वर्षनिहाय नोंदवलेले नीचांकी तापमानाची नोंद
-2013- 6.8
-2014- 7.8
-2015- 6.6
-2016- 8.3
-2017- 8.7
-2018- 5.9
-2019- 13.7
-2020- 8.1
-2021- 11.2
-2022-8.9
-2023-11.3