Pune पुणे : जागतिक वाहतूक कोंडीत पुणे आता चर्चेत आले आहे. जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. टॉम टॉम या (Tom Tom survey) कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार वाहतूक कोंडीच्या यादीत ब्रिटनची राजधानी लंडन पहिल्या क्रमांकावर आहे.
दिल्ली सतराव्या क्रमांकावर…!
बंगळुरू जगात दुसऱ्या क्रमांकावर, पुणे सहाव्या तर दिल्ली सतराव्या क्रमांकावर आहे. या संस्थेनं १० किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरून निष्कर्ष काढला आहे. पुण्यात १० कि.मी अंतर जाण्यासाठी २७ मिनिटं लागत असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. जगातील ५६ देशांमधील ३८९ शहरांमध्ये पुणे शहराला सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून स्थान दिले आहे.
पुण्यात नागरिक खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच पीएमपीएलची स्थिती, त्याचे मार्ग, उड्डणापुलाचं मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकसाठी बंददेखील ठेवण्यात आलेले आहेत. या कारणांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune : सिंहगड किल्ल्याजवळ मधमाशांचा पर्यटकांवर भयानक हल्ला; दहा जण गंभीर..
Pune News : शिव ऋण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे यांना जामीन मंजूर