पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या मोठ्या तिकीट तपासणी मोहिमेमुळे एका दिवसात १.१८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. रेल्वे वापरकर्त्यांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा मिळावी यासाठी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर मंडल रेल प्रबंधक बृजेश कुमार सिंह तथा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या निर्देशनाखाली मध्यवर्ती पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान, विना तिकीट / अनियमित प्रवास करणाऱ्या ४१० प्रवाशांकडून आणि बुक न केलेल्या सामानासाठी १ कोटी १८ लाख रुपये वसूल करण्यात आले. या तपासणीचे निरीक्षण विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) एच. के. बेहेरा यांनी केले. चेकिंग दरम्यान, सर्व प्रवेश-एक्झिट गेट आणि सोयीच्या ठिकाणी तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी वैध प्रवास तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.