पुणे : कल्याणी नगर अपघाताला आता काही दिवस उलटले असून, सदर प्रकरणाच्या तपासालाही वेग आला आहे. या अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात फडणवीसांच्या आदेशानंतर पुणे पोलिस सध्या अॅक्टिव्ह मोडवर आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे.
या प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अग्रवाल कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात आहे आता या प्रकरणी आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. आतापर्यंतच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत. कितीही मोठा व्यक्ती असला कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी या दबावाला बळी न पडता तपास करा.
राज्य सरकार पूर्णपणे पोलीसांसोबत असून पोलिसांकडून योग्य कारवाई झाली पाहिजे. कोणाचाही हस्तक्षेप या प्रकणात खपवून घेतला जाणार नाही, अशी सूचना आयुक्तांना केली आहे. तसेच जीव गेलेल्या दोन मुलांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच कोर्टात केस टिकेल अशा पद्धतीने तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री पुण्याला जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात संघटीत गुन्हेगारीचे कलम वाढवता येईल का? यावरही वरिष्ट पातळीवर विचार सुरू आहे. बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना ही आरोपी करा. समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत.