पुणे : पुणे शहरात वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अशातच कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना देखील रुग्ण तपासणी करुन औषध उपचार करणा-या खोट्या डॉक्टरविरुद्ध विश्राम बाग पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉ. गोपाळ उजवनकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पांडुरंग बबनराव देवडकर (वय 40, रा. पायस सोसायटी, लोकमान्यनगर, नवी पेठ) असे तोतया डॉक्टरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग देवडकर यांच्याकडे वैद्यकीय पदवी नाही. तरीही देवडकर हे नाडी परीक्षण करुन नागरिकांना ओैषध देत होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा पांडुरंग देवडकर यांच्याकडे वैद्यकीय पदवी तसेच व्यवसायाचे प्रमाणपत्र नसल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्ट 1961 चे कलम 33 (1) उल्लंघन केल्याप्रकरणी पांडुरंग देवडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक खाडे करत आहेत.