Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा ! केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक हेमंत पाटील, अंकुश चिंतामण यांना जाहीर..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 November 2024, 16:29

पुणे : ऐन दिवाळीच्या वेळी पुणे पोलिसांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यामधून ‘अह उल सुफा’ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि बिटकॉइन घोटाळा प्रकरणाचा उल्लेखनीय तपास करणारे पुणे सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. राज्य पोलीस दलातील अकरा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

 

हेमंत पाटील हे सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत राबोडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १८ जुलै २०२४ रोजी गस्तीदरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत ‘अह उल सुफा’ या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी पकडले होते. त्यानंतर, देशभरातील २६/११ प्रमाणे हल्ला करण्याचा मोठा कट उघडकीस आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तब्बल दहा लाखांचे रोख पारितोषिक देऊन सन्मान केला होता.

पोलीस शिपाई अमोल नजन, पोलीस हवालदार बालारफी शेख, प्रदीप चव्हाण, पोलीस अंमलदार अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ तसेच वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कामगिरी बजावली होती. पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे पुणे ‘इसिस मॉड्युल’ उघडकीस आले होते. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली. पुढे हा तपास एटीएस आणि नंतर एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला. एनआयएनकडून याचा सखोल तपास करीत एक एक कडी उलगडत नेली. या तपासात आयसीसचे महाराष्ट्र मोड्यूल उघडकीस आले. या कारवाईमुळे देशावरचे मोठे संकट टळले होते.

दिल्ली येथे राहणाऱ्या भारद्वाज बंधूंनी २०१६-१७ मध्ये केलेल्या बिटकॉइन घोटाळ्याचा चिंतामण यांनी तपास केला होता. आरोपींनी बीटकॉईन चलनामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. अनेक गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी एजंटचे जाळे तयार करीत देशभरातून लाखो बिटकॉइन गुंतवणूक स्वरूपात उकळले होते. कोणताही परतावा न देता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती. पुणे शहरात २०१८ मध्ये निगडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास निरीक्षक चिंतामण यांनी केला होता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14
Next Post
three people arrested for cheating family in nashik

विभक्त राहत असलेली पत्नी माहेरच्या व्यक्तींसह पतीच्या घरात घुसली, त्यानंतर दीड लाखांचे दागिन्यांसह लॅपटॉप व मोबाईल चोराला; शेवटी जाताना नवऱ्याचे कपडे जाळले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.