Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवैध धंदे पूर्णपणे थांबवा अन्यथा कारवाईला सामोरे जा; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा पोलिस अधिकाऱ्यांनाच सज्जड दम

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 5 February 2024, 22:41
Pune police commissioner trnasfers senior police inspector of loni kand and hadapsar

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. नव्या पोलिस आयुक्तांसमोर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान असतानाच आता त्यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात एकप्रकारे मोहीम सुरु केली आहे. अवैध धंदे पूर्णपणे थांबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून, तसे न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा सज्जड दमच पोलिस अधिकाऱ्यांना दिला. तसेच कोणाला जर प्रेमाची भाषा समजत नसेल तर त्यांनी त्यांचा आगीसोबत खेळण्याचा शौक पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.

पोलिस आयुक्त कुमार हे पत्रकारांशी बोलत होते. आगामी काळात शहरात कुठलेही अवैध धंद्ये चालू राहणार नाहीत. शहरातील पब रात्री दीडनंतर पूर्णपणे बंद राहणार आहेत. एका दिवसात सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे काही जादूची कांडी नसल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, पुणे पोलिसांच्या कामांमध्ये पारपदर्शकता राहणार असून, परिणामकारक पोलिसिंग करण्यावर आमचा भर असणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देखील पुणे पोलिस योग्य ती पावले उचलणार असून, आवश्यक तिथे दामिनी पथकाची पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे.

याशिवाय, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी पुणे पोलिस तत्पर असून, त्या दृष्टीकोनातून मंगळवारी आयुक्तालयात बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये आपण स्वतः पोलिस अधिकार्‍यांना सूचना करणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

77 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार

 

5 वर्षापेक्षा अधिक काळ एकाच पोलिस स्टेशन अथवा एकाच विभागात (गुन्हे शाखा / वाहतूक शाखा / विशेष शाखा / मुख्यालय) कर्तव्य बजाविणार्‍या पोलिस कर्मचारी तसेच अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या 77 पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य

शहरात ज्या-ज्या प्रमुख चौकामध्ये वाहतूक कोंडी होते. त्याच्या वेळा काय आहेत, ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच संदर्भात मंगळवारी पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होणार्‍या प्रमुख चौकांची यादी काढून त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे.

…तर पोलिस अधिकाऱ्यांकडेच मागणार उत्तर

रेकॉर्डवरील तडीपार, पॅरोलवर सुटलेले, खून, खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यातून जामिनावर असलेल्या गुन्हेगारांकडून गुन्हा घडल्यास त्याबाबतचे उत्तर संबंधित पोलिस अधिकार्‍यांना, संबंधित पोलिस स्टशेनच्या तपास पथकास (डीबी) विचारण्यात येणार आहे. तडीपार गुन्हेगार शहरात आढळून आल्यास त्याच्यावर तर कारवाई होणारच आहे. पण संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍याकडे त्याबाबत त्याच्यासंबंधीची विचारणा देखील करण्यात येणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08
Next Post
Rohit Pawar talks about ED action against him in beed

माझ्यावर कारवाई करतील, अटक करतील, तरीही मी मैदान सोडणार नाही : रोहित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp