Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 31 August 2026, 8:08

पुणे : पुण्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पुणे शहर सध्या भाजपचा मजबूत गड मानला जातो. शहरातील 8 पैकी 6 आमदार भाजपचे असून दोन्ही लोकसभा खासदारही भाजपचे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्येही पक्षाचे महत्त्वाचे प्रतिनिधित्व आहे. पुणे महापालिकेतही भाजपकडे मोठे संख्याबळ आहे.

अशा परिस्थितीत काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद भाजपसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा केली. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

विशेषतः तरुण मतदारांमध्ये काँग्रेसला पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता आहे का, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. ‘छात्रों की गूंज’ ला आलेल्या प्रतिसादानंतर भाजपने पुण्यातच प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीसाठी राज्यभरातून तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुण्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद दाखवण्यासोबतच आगामी राजकीय रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुण्यात होणारी ही पहिली मोठी प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुढील दिशा काय असेल, याकडेही लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत तरुणांना पक्षाशी जोडण्यावर आणि ‘विकसित महाराष्ट्र’च्या संकल्पनेत युवकांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्याची शक्यता आहे. सरकारी योजनांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवणे आणि संघटनात्मक पातळीवर युवकांचा सहभाग वाढवणे, यावरही मार्गदर्शन होऊ शकते.

दरम्यान, आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम आणि निवडणुकीचे नियोजन यावरही बैठकीत चर्चा होणार आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर पुण्यात भाजपची एवढी मोठी बैठक होत असल्याने राजकीय वर्तुळात याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

पुण्यात तरुण मतदारांचा कल बदलत आहे का, काँग्रेस त्याचा फायदा घेऊ शकते का आणि भाजप या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टची भाजपची बैठक पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp