पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सलीम खान आणि नसीरुद्दीन खान अशी संशयितांची नावे आहेत. विमानतळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान व नसीरुद्दीन खान या दोघांनी इंडिगो एयर लाइनचे बनावट तिकिट तयार केले होते. या तिकीटाच्या मदतीने हे इंडिगोच्या विमानाने उड्डाण करून लखनऊला जाणार होते. या साठी त्यांनी हे बनावट तिकीट दाखवून त्यांनी विमानतळाच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. विमानतळवरील सुरक्षा प्रणालीतून जात असतांना एअरपोर्ट अधिकाऱ्यांना त्यांचे तिकीट हे बनावट असल्याचे आढळले. या प्रकरणी त्यांनी विमानतळावरील सुरक्षा रक्षकांना माहिती देत त्यांना तातडीने अटक करण्यास सांगितली. यानंतर त्यांना विमानतळ पोलिसांकडे देण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलीस सध्या त्या आरोपींचे चरित्र आणि यांचे दहशतवाद्यांशी काही कनेक्शन आहे का? या दृष्टीने तपास करत आहेत. त्या दोघांनी बनावट तिकीटावर प्रवास करण्याचा बेत का आखला होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहेत.