पुणे : आपण समाजाचे काहीतरी देणं असतं. या भावनेतून पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशने समाजातील गोरगरीब, अनाथ व पालकांचे छत्र हरपलेल्या मुलींच्या मदतीला धावून आले. आणि असोसिएशने सामाजिक बांधिलकी जपत तीन मुलींचे कन्यादान करून लग्नाचा संसारोपयोगी वस्तू भेट स्वरुपात दिले आहे. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील बारा वर्षापासून गुडविल इंडिया हि सामाजिक संस्था आहे. या संस्थेने गोर गरीब मुलींना मदत करण्यासाठी गुडविल अंतर्गत कन्यारत्न विवाह मदत योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना भांड्यांचा संसार, साडी व चप्पल त्यांच्या लग्नामध्ये भेट देण्यात येते. यामधे अनेक दानशूर लोक व संस्था या मुलींचा किंवा त्यांच्या पालकांचा आर्थिक भार हलका व्हावा या उद्देशाने मदत करीत असतात.
दरम्यान, हाच विचार घेऊन व सामाजिक भान ठेवून पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे सदस्यांनी सलोनी शेलार, (अहिरे गाव), रोहिणी दगडे (धानोरी रोड), अनिशा चांदिलकर (लवळे) या तीन गरजू मुलींचे कन्यादान केले आहे. या संस्थेने आतापर्यंत 800 हून अधिक मुलींचे कन्यादान केले आहे. तसेच संस्था कपडे व आश्रम शाळांना मोफत अन्नदान करीत आहेत. तसेच या संस्थेने 80 हून अधिक महिलांना रोजगाराची संधी दिली आहे.
या वेळी पनामा फाउंडेशनचे अध्यक्ष समीर लडकत, मानसी लडकत, पेट्रोल डीलर्स असोसिएशने पुणे अध्यक्ष ध्रुव रूपारेल वर्किंग कमिटी सभासद सुजाता शहा, सुनील शिंदे, अमर रेणुसे, भाग्येंद्रसिंह चुडासामा, जोनाथन डीमेलो उपस्थित होते.