पुणे : पुणेकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहर परिसरात झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. शहरात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. झिका व्हायरसचे रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रावर झिकाचं संकट
पश्चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसचा वेगाने प्रसार होत आहे. रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये देखील झिका व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. झिका व्हायरसचा जास्त प्रमाणात धोका गर्भवती स्त्रियांना आहे.
असा करा झिकापासून बचाव..
झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे. घरामध्ये डास होणार नाही, याची काळजी घेण गरजेच आहे. घरात स्वच्छता ठेवा. मच्छरदाणीचा जास्तीत जास्त वापर करा. घरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
घरात डास आले तर त्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा. संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका. कापूराचा वापर करून तुम्ही १५ ते २० मिनिटात डासांना दूर पळवू शकता. कडुलिंब आणि नारळाचं तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा. दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगण्याचं आवाहन झिका आणि डेंग्युच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं आहे.