Pune NIA Raid : पुणे : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इंटेलिजेन्स ब्यूरो (आयबी) यांच्यांकडून पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयए आणि आयबीची छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
या ठिकाणावरुन जुबेर शेख (वय ३९ वर्ष) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात तपास संस्थांचे पथक सोमवारी पहाटेच सकाळीच कोंढव्यात पोहचले. त्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये छापेमारी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अन् आयबी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत काही कागदपत्रे जप्त केले आहे. ही कारवाई कशामुळे झाली ही माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, जुबेर शेख याचे कोणाशी कनेक्शन होते? तो इसिसच्या कोणाच्या संपर्कात होता, ही माहिती चौकशी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु या प्रकारामुळे पुणे शहरात खळबळ माजली आहे. ही कारवाई कशामुळे केली गेली आहे? याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.