Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अंदाजच कळेना; पुणे जिल्ह्यात घालमेल वाढली

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 25 February 2025, 13:25

शिरूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत अजूनही संदिग्धता असून तिकीट मिळविण्याच्या तयारीत बसलेल्या पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची घालमेल मात्र वाढत चालली आहे.

‘जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट तुम्हालाच पाहिजे? मग तुम्ही मतदारांमध्ये जा… ज्याची विकासाची गुणवत्ता जास्त त्याचे परीक्षण करून पक्षाचे तिकिट त्यालाच… असे आश्वासन विविध पक्षांतर्फे दिल्यानंतर नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यानंतर कामाला देखील लागले. पण निवडणुकीचा पत्ताच नाही आणि कधी होईल त्याचा अंदाज परिणामी अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात घालमेल सुरू आहे. अनेक वर्षे मेहनत करून राजकारणात आयुष्य पणाला लावले. मात्र निवडणूकच होत नसल्याने मेहनत तरी कशाला करायची असाही सूर कार्यकर्त्यांच्या खासगी बैठकांत निघू लागला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यकाळ केव्हाच संपल्याने या ठिकाणी प्रशासकराज सुरू आहे. अशात निवडणुका अजूनही जाहीर न झाल्याने पुणे जिल्ह्यात या निवडणुकांवरच शंका निर्माण होऊ लागली आहे. निवडणुका कधीही लागतील या आशेवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते होते. पण कोणताच अंदाज येत नसल्याने ते निराश दिसू लागले आहेत.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची यादी प्रत्येक पक्षात मोठी आहे. त्यातून राष्ट्रीय पक्षांमध्ये पडलेली फुट पाहता यावेळी तिकीट कोणाला मिळणार ? याचे कुतुहल सर्वांनाच आहे. आमदारकीच्या निवडणुकीनंतर झालेली पडझड तसेच कमी झालेले मतदान याचा विचार जाणकांराकडून होऊ लागला आहे. विकास कामांच्या जोरावर मिळवलेले मतदान कमी का झाले या बाबत सगळ्याच नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे.

 

पक्षासाठी काम केल्याने भविष्यातील निवडणुकीत तिकीट आपल्यालाच असा बहुतेकांचा दृढ विश्वास आहे. पण निवडणूकाच झाल्या नाही तर…? असा सवाल सध्या दबक्या आवाजात बोलला जाऊ लागला आहे. निवडणुकांवर ओबीसी आरक्षणाने बंदी आणण्यात आली आहे. जोपर्यंत न्यायालयातून निकाल येत नाही. तोपर्यंत निवडणुक होणार नाहीत. राज्य निवडणूक आयोगावर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषदा यांच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी असते. २६ एप्रिल १९९४ रोजी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. पंचायतीच्या विसर्जनानंतर सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. प्रशासक किती वर्षे ठेवायचा याची तरतूद नसल्याने निवडणुका अजूनही लांबल्या आहेत.

तरच निवडणुका…

 

ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करून निवडणुका घेऊ शकते. सध्याच्या सरकारने निवडणुकांचा विचार करणे आवश्यक असून त्यामुळे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती धोक्यात आहेत. न्यायालयाचा निकाल झाल्यावर निवडणुकीबाबत निर्णय होईल.

अरूण गिरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष

 

 

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

बारामती येथे पशुवैद्यक महाविद्यालय स्थापनेस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्वाचे निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp