Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दारूच्या नशेत तसेच पूर्ववैमनस्यातून खूनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना शनिवारी (ता. २) पहाटे एकच्या सुमारास काळेपडळ येथील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या शेजारील रस्त्यावर घडली आहे. महादेव रघुनाथ मोरे (वय २५, रा. काळेपडळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune News) या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून, पोलिसांनी मुलांना ताब्यात घतले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune News) या खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कोरियात नृत्य शिकण्याच्या इच्छेपायी विश्रांतवाडीतील दोन मुलींचा घरातून पोबारा
Pune News : निरक्षरांच्या सर्वेक्षणावर माध्यमिक शाळांतील शिक्षकांचाही बहिष्कार…