Pune News ; पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक अनुचित घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना येथील सेवक वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनेश वाल्मिकी (वय ३०), प्रतिक मल्हारी (वय २३, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय २५, रा. चिखलवाडी, ओैंध) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा किशोर तांबोळी (वय ३५, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वाल्मिकी आणि तांबोळी मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीत वास्तव्याला आहेत. वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. (Pune News) मात्र, तांबोळी यांनी त्यास नकार दर्शवला तसेच याच वसाहतीतील एका मोठ्या मंडळाला यापूर्वीच वर्गणी दिलेली असल्याने, पुन्हा वर्गणी देणे शक्य नसल्याचे सांगितले. या कारणावरुन दोघांमध्ये प्रथम शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर याचे पर्यवसन जोरदार वादामध्ये झाले. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली.
या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक रायकर करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दिवे घाटात बिबट्याचे भरदिवसा रस्त्यावर ठाण; वाहनचालकांची तारांबळ
Pune News : ‘रियटर’च्या कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत उपोषणाचा इशारा