Pune News : पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या अमोल मुरलीधर माने (वय २८) यांनी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांच्या एसएलआरमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. स्वतःच्या विवाहासाठी घेतलेल्या रजा संपवून पुन्हा कामावर हजर झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट होते. याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. माने यांच्या मृत्यूमागील नेमके कारण समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून सहा जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमसंबंधातून आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून त्याने ही आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याच्या प्रेमिकेसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) पल्लवी दिनकर धुमाळ (रा. जेल वसाहत), दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतिक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहू लॅबवाला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान सदाशिव गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५१५/२३) दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात २७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजता घडला होता.
माने यांच्या आत्महत्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा सीआरपीसी १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. संबंधित गुन्हेच्या तपासावरून अमोल याचे प्रेम संबंध असताना, पल्लवी हिने लग्नास नकार दिला होता. तसेच इतर आरोपींनी अमोल याच्या रूमवर येऊन ‘येथून निघून जा, अन्यथा तुला सस्पेंड करीन, नोकरीवरून काढीन’ अशी धमकी देत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला होता. (Pune News) पोलिसात तक्रार दिल्यास, तू एकटाच येथे राहत आहेस, तुला आम्ही मारून टाकू, अशी धमकी देखील आरोपी सातत्याने देत होते.
दरम्यान, अमोल याचे दुसऱ्या मुलीसोबत जानेवारी महिन्यात लग्न झाले. त्यानंतर गावावरून परतल्यानंतर संबंधित आरोपींनी अमोल यास, तू लग्न कसे काय केले, तुझी बदनामी करतो, खोटा गुन्हा दाखल करतो, असे बोलून त्याला मारहाण करून मानसिक त्रास दिला. (Pune News) या गोष्टीचे दडपण अमोलवर आले होते. दरम्यान, याच तणावातून गार्ड ड्युटीवर असताना त्याने स्वत:जवळच्या एसएलआरमधून गोळी झाडून आत्महत्या केली.
पोलीस निरीक्षक कांचन जाधव या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र खराडकर यांची निवड.
Pune News : सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने खरेदी केले ३ मोबाईल फोन