Pune News पुणे : पंधरा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात मोबाईल सापडल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने घेतलेल्या झडती मध्ये आणखी एक सीमकार्ड नसलेला मोबाईल सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकारावर आळा घालण्यासाठी कारागृह प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कारागृहातील मोबाइलचा बेकायदा वापर थांबविण्याच्या दृष्टीने कैद्यांसाठी अधिकृत दूरध्वनी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.(Yerwada Central Jail has taken ‘this’ big decision to stop the use of illegal mobiles)
प्रायोगिक तत्त्वावर फोन बूथ सुविधा
राज्यात येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देण्यात येणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील सर्व कारागृहांमध्ये फोन बुथ सुरू करण्यात येणार आहेत. (Pune News ) कारागृहातील कैद्यांना कुटुंबीयांशी संवाद साधता यावा, यादृष्टीने येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुढील आठवड्यापासून तीस फोन बुथ सुरू करण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रयोग यशस्वी ठरल्यास फोन बुथची संख्या वाढवली जाईल. तसेच राज्यातील सर्व कारागृहांमध्येदेखील ही सुविधा सुरू करण्यात येईल. मकोका आणि गंभीर गुन्ह्यातील कैद्यांनाही ही सुविधा देण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्य कारागृह व सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिली.
एखाद्या कैद्याकडे मोबाइल आढळला म्हणून इतरांच्या अधिकारांवर गदा आणता येणार नाही. उलट फोनची सुविधा अधिकृतपणे सुरू झाल्यास मोबाइलचा बेकायदा वापर थांबेल. (Pune News ) फोन बुथ सुविधेबरोबरच कैद्यांच्या भेटीची वेळ वाढविण्याबाबतही निर्णय घेतला जाईल,’ असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
येरवडा कारागृहात बराक क्रमांक एकमध्ये एका कैद्याकडे मोबाईल सापडल्याची घटना मागील महिन्यात उघडकीस आली होती. एप्रिल महिन्यात कारागृहातील स्वच्छतागृहात मोबाइल सापडला होता. गेल्या वर्षी कारागृहात मोबाइल आणि अंमली पदार्थ सापडले होते. (Pune News ) वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कारागृहातील जॅमर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तसेच सुरक्षिततेचाही मुद्दा उपस्थित झाला होता. या मोबाइलमध्ये सीमकार्ड आणि बॅटरी असल्याने मोबाइलचा पुरवठा बाहेरून होत असल्याचा संशय पोलिसांना होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात सुरक्षा रक्षक भरतीच्या नावाखाली तरुणांची लूट; मंडळाकडून ‘अलर्ट’
Pune News : ‘वर्क फ्रॉम होम’चा मोह नडला; पुण्यातील ‘आयटी’तील दोघांना 50 लाखांचा गंडा