Pune News : पुणे : जेष्ठ कथालेखक, कादंबरीकार आणि अक्षर मानव चळवळीचे प्रमुख राजन खान यांच्या मुलाने तळेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. २) उघडकीस आली. सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये ही घटना घडली.
आयुष्यात आईचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही… सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली खंत
डेबू राजन खान (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेबू खान हा घरी एकटा राहत होता. त्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Pune News) आत्महत्या केली तेव्हा तो घरी एकटाच होता. डेबू याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यामध्ये आई तसेच मैत्रिणीचा उल्लेख आहे. तीन पानी चिठ्ठी पोलिसांना आढळली आहे. त्याची आई, मैत्रीण आणि कर्ज फेडणारे लोक यांच्या नावे चिठ्ठीमधील मजकूर आहे. आईचा चांगला मुलगा आयुष्यात होऊ शकलो नाही. तसेच कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत सांगितले आहे. याबाबत पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे.
डेबू हा आयटी अभियंता होता. सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती याठिकाणी तो राहण्यास होता. दरम्यान, सकाळपासूनच डेबू घराबाहेर न आल्याने घरमालकिणीला संशय आला. तिने याबाबतची माहिती पुण्यात राहणाऱ्या त्याच्या भावाला दिली. भाऊ तत्काळ सोमाटणे फाटा येथे आला. (Pune News) त्याने दरवाजा वाजवला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने तळेगाव पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी डेबू हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
डेबूने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा उल्लेख असून, अनेकांकडे त्याचे पैसे अडकलेले होते, अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली. (Pune News) डेबू याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डेबूसोबत फ्लॅटवर आणखी कोण राहत होते, त्याचे कुठे आर्थिक व्यवहार सुरू होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर विशेष मेगा ब्लॉक ; दोन दिवस अनेक गाड्या रद्द
Pune News : पुणे ग्रामीण विभागात दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न