Pune News : पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पायभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, मंजूर झालेला निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे. निधी वळविण्यामागे भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कुरघोडीचे राजकारण आहे. या कृतीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर १० कोटींचा निधी न दिल्यास, पाटील यांच्या घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
कसबा मतदारसंघातील निधी पर्वती मतदारसंघात वळविल्यामुळे धंगेकर संतप्त
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत धंगेकर यांनी हा इशारा दिला. धंगेकर म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघासाठी राज्य सरकारकडे मी जवळपास १०० कामे सुचविली होती. त्यासाठी १० कोटींचा निधीदेखील मंजूर झाला होता. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निधी पर्वती विधानसभा मतदारसंघात वळविल्याची माहिती मिळत आहे. (Pune News ) या कृतीचा मी निषेध करतो. तुम्ही माझा अपमान करा, तो मी अपमान सहन करेन. पण मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा अपमान सहन करणार नाही. शहरातील ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील कार्यक्रमासाठी जातील, त्या ठिकाणी मी आंदोलन करून जाब विचारणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : प्रत्येक पोलीस ठाण्याला मिळणार चार निरीक्षक
Pune News : दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन, दोन पिस्टलसह ७ काडतुसे जप्त
Pune news : प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल; ११ कोटी २३ लाखांचा अपहार