Pune News : पुणे : दोन मित्र हॉटेलमध्ये गेले होते. भरपेट जेवण झाल्यानंतर जेवणाचे बिल समोर आले. बिलामध्ये सर्विस टॅक्स लावल्याने तरुणांनी हॉटेलच्या व्यवस्थापकाला विचारणा केली. त्याचा राग अनावर झाल्याने हॉटेल मॅनेजर आणि वेटरने मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी तरुणांनी केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील व्यावसायिक हुजेफा अत्तरवाला (वय ३८) हे एनआयबीएम रस्त्यावरील स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील होते. (Pune News) जेवणाच्या बिलाची एकूण रक्कम २०३० रुपये होती. या बिलात १७६.५० रुपये सर्विस टॅक्स लावला होता. त्यामुळे त्यांनी बिलिंग काऊंटला जाऊन हॉटेल मॅनेजरला याबाबत विचारणा केली.
आपल्याला जाब विचारल्याचा हॉटेल मॅनेजरला राग आला. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्याचे रुपातंर हाणामारीत झाले. काचेच्या भांड्याने आणि बिअरच्या बाटलीने त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अत्तरवाला यांना मार लागला. (Pune News) या प्रकरणी हॉटेल मॅनेजर जम्मेकर सामल, वेटर मौसम कुंवर याच्यासह इतर तीन वेटरवर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्तरवाल यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र अनिकेत परदेशी आणि राम त्यागी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला, तर राम त्यागी यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताच्या बोटाला धारदार शस्त्राने जखमा केल्या गेल्या. (Pune News) जखमी झालेले अत्तरवाल यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, यावेळी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; राज्य मंडळाची घोषणा