Pune News : पुणे : ‘तू मला भेटत का नाहीस?’ अशी विचारणा करत, एका माथेफिरू तरुणाने तरुणीला दंडुक्याने अमानुष मारहाण करून तिचे डोके फोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद
पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दर्शना पवार हत्याकांडानंतर पुण्यातील सदाशिव पेठेत भरदिवसा तरुणीवर कोयता हल्ला झाला. (Pune News) लागोपाठ घडलेल्या घटनांनंतर पुणे हादरले असतानाच एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीला मारहाण करून तिचे डोके फोडल्याचे समोर आले आहे.
संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी खराडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या ३७ वर्षांच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, म्हस्के हा फिर्यादी तरुणीचा मित्र आहे. म्हस्के याचे संबंधित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. आपापसातील वादातून मागील काही दिवसांपासून तरुणी संकेतसोबत बोलत नव्हती. त्याच रागातून संकेतने तिला बुधवारी सायंकाळी बर्निंग घाट परिसरात गाठले. ‘तू माझ्याशी बोलत का नाहीस, मला भेटत का नाहीस,’ अशी विचारणा त्याने केली. मला तू आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझी झाली नाहीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही, (Pune News) अशी धमकीही त्याने दिली.
दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणीने ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही, मी तुझी फक्त मैत्रीण राहू शकते’ असे सडेतोड उत्तर दिले. तरुणीचे उत्तर ऐकून संतप्त झआलेल्या तरुणाने तिला दंडुक्याने अमानुष मारहाण करून तिचे डोके फोडल्याचा आरोप आहे. चिडलेल्या तरुणाने तरुणीला शिवीगाळ केली. आरोपीने तिला दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हातावर आणि पायावर वार केल्याने तरुणी खाली पडली. त्यानंतरही निर्दयीपणे तरुणीच्या डोक्यात दांडक्याने वार करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेत तरुणीचे डोके फुटल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ तपास करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला खराडी येथील आयटी कंपनीत नोकरी करते. तिचा घटस्फोट झाला आहे. काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्के याच्याशी तिची ओळख झाली. (Pune News) याच दरम्यान महिलेचा घटस्फोट झालेला पती पुन्हा तिच्या संपर्कात आला. म्हस्के याने जेव्हा तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा तिने आपला पती पुन्हा संपर्कात असून मी तुझी फक्त मैत्रीण राहू शकते, असे सांगून म्हस्केला ब्लॉक केलं होतं.
बुधवारी सकाळी सात वाजता महिला बर्निंग घाट येथे एका मित्राकडे आली होती. त्यावेळी संकेत रिक्षातून आला. त्याने पाठीमागून येऊन फिर्यादीला पकडले.(Pune News) शिवीगाळ करत त्याने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या हातावर जोरात मारले. या हल्ल्यात फिर्यादी खाली पडल्यावर तिच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून संकेत म्हस्के पळून गेला.
दरम्यान, फिर्यादीवर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक वराळे अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : छगन भुजबळ धमकी प्रकरणात नवीन ट्विस्ट; तरुणाला केलेली अटक बेकायदा!
Pune News : दाजीच्या खून प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर ; ॲड. सुधीर पाटील यांचा प्रभावी युक्तिवाद