Pune News : पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात काल (ता. २ जून) भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या घडामोडींनंतर कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या मोदी बाग येथील निवासस्थानी सर्व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपली बाजू मांडत पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भूमिका
पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “गेल्या २४ ते २५ वर्षांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते, कार्यकर्ते हे आरएसएस आणि भाजपच्या विचारांविरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले आहेत. (Pune News ) आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यासाठी एवढी वर्षे लढत आलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये दादांवर जरी आमचे प्रेम असले तरीही आम्ही शरद पवार यांना सोडून जाण्याचा विचार करत नाही. तसेच कुठलाच कार्यकर्ता असा विचार करत नाही”, असे यावेळी प्रशांत जगताप म्हणाले.
आम्ही शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जगताप म्हणाले की, सध्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. (Pune News ) कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था आहे. मात्र, पुण्यातील सर्व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि उद्याही असू, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी सराईत टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई..