Pune News : पुणे : पुण्यात विसर्जन मार्गावरील दणदणाटाने यंदा आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनीवर्धक, ढोल-ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरात आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे परिसरातील रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले. विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते.
परिसरातील रहिवाशांसह भाविकांनाही त्रास
पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून मिरवणुकीला सुरवात झाली. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील छोटे रस्ते मध्यरात्रीनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. (Pune News) मानाच्या गणपतीला निरोप दिल्यानंतर विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर ध्वनिवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई केली होती. तरुणाई बेधुंद होऊन नाचत मिरवणुकीत नाचत होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. मात्र, तरुणाईचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. आकर्षक देखावे प्रकाश योजनेमुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली. बाजीराव रस्ता मार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने उच्च क्षमेतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर केला होता. (Pune News) ध्वनिवर्धकांचा दणदणाटामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणाऱ्या भाविकांना त्रास झाला. ढोल-ताशा पथकांचा आवाजाने मर्यादा ओलांडली होती. भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला.
ध्वनिवर्धक तसेच ढोल ताशाच्या पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलीसही हतबल झाले होते. विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Pune News) सायंकाळनंतर विसर्जन मार्गावर गर्दी झाल्याने चालणे देखील अवघड झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पांचे ८ वाजून ५० मिनीटांनी मोठ्या थाटात विसर्जन…
Pune News : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी… भक्तीमय वातावरणात मानाच्या बाप्पांना निरोप!