Pune News : पुणे: धुम स्टाईलने गाडी पळवणाऱ्या तरुणांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या तपासात मोठी केस उलगडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएसके यांच्या महागड्या विदेशी दुचाकी चोरणारी टोळी वडगाव मावळ पोलिसांनी जेरबंद केली. ( Vadgaon Maval police n arrested Dhoom style bike riders; A big case has been solved)
डीएसके यांच्या महागड्या दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
आरोपींकडून ९ लाख ५० हजारांच्या एकूण ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune News)
हरिदास सिताराम चवरे (वय ३० रा.टाकवे,मुळगाव रा.भटसागवी, हिंगोली) परशुराम दिगंबर सरडे वय ३१.रा अहिरवडे मुळगाव इंगळकी ता. अक्कलकोट जि. सोलापूर)तुफैल अलीम खान वय २१ रा.अहिरवडे मुळगाव उत्तरप्रदेश) इमरान रिझवान खान ( वय २५ अहिरवडे फाटा मुळगाव उत्तर प्रदेश)अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.
डीएसके कारागृहात असून त्यांचे गोडाउन हे मावळातील टाकवे गावात असून युनियन बँकेच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मावळात असलेले हे गोडाउन मागील वर्षी जून 2022 ला फोडून या टोळीने महागड्या विदेशी स्पोर्ट्स मोटरबाईक गाड्या धूम स्टाईलने लांबविल्या होत्या.
विदेशी मोटर बाईक ज्यांचे हप्ते थकले होते. युनियन बँकेच्या ताब्यात असलेल्या गोडाउनमधून चार चोरट्यांनी हात साफ केला. (Pune News) मात्र, महागड्या असलेल्या या गाड्या रजिस्ट्रेशन नसल्याने या चोरांची मोठी अडचण झाली होती. वडगांव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या वर्षी जून 2022 ला टाकवे गावात बंद असलेल्या कंपनी गोडाउन फोडून महागड्या 5 विदेशी गाड्या लंपास केल्या होत्या.
युनियन बँकेचे अधिकारी दीपक ताराचंद यांनी गोडाउन फोडून गाड्या चोरल्याची तक्रार वडगांव मावळ पोलिसांत दिली होती.(Pune News) त्यानुसार वडगांव पोलिसांचा तपास सुरू होता.
त्याबाबत तपास करत असताना वडगांव मावळ पोलिसांना चोरांची चाहूल लागली. विदेशी गाड्या धूम स्टाईलने फिरवत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, सचिन गायकवाड आणि सचिन काळे हे गस्तीवर असताना बेनली मेड जर्मनी या विदेशी मोटरबाईकसह चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. (Pune News)
या तपासादरम्यान लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी वडगांव पोलिसांना मोटार बाईक चोरांचा पाठलाग करण्याचा कानमंत्र देताच चोर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. (Pune News) वडगांव मावळ न्यायालयात आरोपींना हजर केले असता आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत ; विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा
Pune News : पुण्यात हिंसापीडित कुस्तीगीर महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध छात्रभारतीचे आंदोलन