Pune News : जेजुरी (पुणे) : जुन्या वादाच्या भांडणातून जिवे मारण्याच्या उद्देशाने एकाने दोघांच्या पोटात चाकूने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे.
पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे घडली घटना
चाकूच्या हल्ल्यात विशाल अनंता कड (वय ३५) व चुलत भाऊ संतोष कड (दोघेही रा. चौंडकर वस्ती, नायगाव, ता. पुरंदर) हे दोघे जखमी झाले आहेत. (Pune News) तर आरोपी जालिंदर चौंडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी (दि. २०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नायगाव येथील चौकात जुन्या भांडणाचा राग मनात धरून जालिंदर चौंडकर याने फिर्यादी विशाल कड व त्याचा चुलत भाऊ संतोष कड या दोघांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसून गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune News) जेजुरी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील १३ ‘डायलिसिस’ यंत्रे बंद ; रुग्ण वाऱ्यावर
Pune News : रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा ; आरटीओच्या कामाला येणार गती