Pune News : कोंढवा : पुण्यातील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले. तू खालच्या जातीतील आहेस, त्यामुळे तुला पळवून मी पस्तावलो आहे, असे सांगत तिला एकत्रित आत्महत्या करण्याची गळ घातली. आत्महत्येस नकार दिल्यानंतर तरुणाने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वत:वर चाकून वार करत इमारतीच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी संबंधित माथेपीरू तरुणाला रहिवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढव्यात थरार!
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश प्रकाश थोरात (वय २८, रा. साकुर्डी, सातारा) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत एका १९ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
योगेश थोरात हा तरुणीच्या घराशेजारी राहत होता. त्याने गोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती अल्पवयीन असतानाच तिला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले. (Pune News) त्यानंतर दोघे सातारा तसेच कोल्हापूर परिसरात एकत्र राहत होते. आरोपी थोरात वाहनांवर चालक म्हणून काम करत होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगेश आणि तरुणी कोंढव्यातील गोकुळनगर भागात वास्तव्यास आले. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाले. दोन दिवसांपूर्वी त्याने तरुणीला एकत्र आत्महत्या करु, असा तगादा लावला. तू खालच्या जातीतील आहेस. त्यामुळे मी तुला पळवून पस्तावलो आहे, असे सांगत आत्महत्येसाठी तिच्यावर जबरदस्ती केली. (Pune News) तरुणीने आत्महत्या करण्यास ठाम नकार दिल्यानंतर त्याने मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून तरुणीने कशीबशी आपली सुटका करून घेतली. त्यानंतर संतप्त झालेल्या योगेशने स्वतःच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. तसेच राहत्या इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (Pune News) याबाबत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लवासा हिल स्टेशनची १८१४ कोटींना विक्री; देशातील पहिल्या हिल स्टेशनची कोणी केली खरेदी?
Pune News : काँग्रेसच्या गोटात प्रदेशाध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग