Pune News : पुणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात हिंजवडी रस्त्यावरील लक्ष्मी चौकाजवळ असलेल्या विठ्ठल लॉन्ससमोर बुधवारी (ता.२३) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला.
रामदास वडजे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रंगनाथ रामभाऊ तांबे (वय ४५, रा. भारत पेट्रोल पंप शेजारी भिवंडी वाडा रोड झिडके गाव, पोस्ट दिघशी. जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. (Pune News) याप्रकरणी रामदास यांचे भाऊ संजय माधव वडजे (वय २८, रा. रणदिवे बिल्डींग गुरुद्वार चौक, आकुर्डी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय वडजे यांचा भाऊ रामदास वडजे हे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामाला चालले होते. दरम्यान, त्यांची दुचाकी हिंजवडी रस्त्यावरील लक्ष्मी चौकाजवळ आली असता, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव वेगाने ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात रामदास वडजे हे रस्त्यावर पडले. (Pune News) त्यानंतर त्यांच्या अंगावरून ट्रकचे पाठीमागचे चाक गेले. या अपघातात रामदास वडजे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी रामदास यांचे भाऊ संजय वडजे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी रंगनाथ तांबे याला अटक केली आहे.
नागरिक व्हिडिओ काढण्यात दंग
या अपघातात रामदास वडजे हे ट्रकखाली अडकलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते ट्रकखाली अडकलेले असताना काही नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न न करता, व्हिडिओ शुटींग केले. ही खूप निंदनीय बाब आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अनंतराव पवार महाविद्यालयास नॅक मानांकनाची ‘अ’ श्रेणी प्राप्त
Pune News : व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक; पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांचे मत
Pune News : विमाननगर परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीवर मकोका; पुणे पोलिसांची मोठी कारवाई